Special Report : अमरावतीत राजकीय नाट्य पुन्हा सुरू; बच्चू कडू-राणा दाम्पत्याचं संघर्ष शिगेला! ”कारण?… एकच दावा”
प्रहारचे संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या जागेसह आमदारकीच्या 15 ते 20 जागा मागितल्या आहेत. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या जागा प्रहारला मिळावी, अशी मागणी केली आहे.
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा होत असताना धुसफूस पहायला मिळत आहे. याच दरम्यान युतीत देखील जागा वाटपावरून मै मै तू तू पहायला मिळत आहे. तर आता भाजपला त्यांच्याच मित्र पक्षांची डोकेदुख होताना दिसत आहे. प्रहारचे संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या जागेसह आमदारकीच्या 15 ते 20 जागा मागितल्या आहेत. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या जागा प्रहारला मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यावर विद्यमान खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी ही कडूंना जशास तसे उत्तर दिले आहे. त्यांनी एनडीए चे खासदार म्हणून नवनीत राणांची चर्चा झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना मी मध्यंतरी भेटलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. म्हणून कोण कुठली जागा मागतोय, याने काही फरक पडत नाही. याचा अंतिम निर्णय मोदीजी आणि फडणवीस साहेब घेतील. म्हणून कुणीही कितीही दावे केले, ते दावे खोडून काढण्याची ताकद रवी राणा मध्ये आहे. तर निवडणुकींच्या तयारीत आम्ही आहोत. 15 ते 20 जागा विधानसभेच्या आणि एक जागा लोकसभेच्या लढवणार. निवडणुकींच्या सामोरे जाताना जर युतीचा घटक पक्ष म्हणून पुढे जाता नाही आलं तर आम्ही निवडणुकींना वेगळे सामोरे जावू, असा ईशारा त्यांनी भाजपला दिला आहे.