'असे तडतड फुलबाजे, फटाकडे हे उडत राहतात', सुषमा अंधारे यांचा निशाणा नेमका कुणावर?

‘असे तडतड फुलबाजे, फटाकडे हे उडत राहतात’, सुषमा अंधारे यांचा निशाणा नेमका कुणावर?

| Updated on: Apr 23, 2023 | 9:05 AM

VIDEO | शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तर, काय केली नेमकी टीका?

मुंबई : जळगाव येथील पाचोरा येथे आज 23 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेआधीच शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध ठाकरे गटाते खासदार संजय राऊत असा सामना बघायला मिळत आहे. मी वाघ आहे मला कुठल्याही सुरक्षेची गरज नाही असं संजय राऊत त्यांनी म्हटल्यानंतर आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत संजय राऊत यांना आंदोलन कसं करतात हे माहित नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं तर दगड मारून आंदोलन आणि सभा करणारे लोक आम्ही आहोत, त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करू नये, असं गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गट तसेच संजय राऊत यांना इशारा दिला होता. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. नवी मुंबईत बोलत असताना सुषमा अंधारे यांनी गुलाबराब पाटील यांच्या दगड मारण्याच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, ‘गुलाबराव पाटील यांनी ठाकरे यांच्या सभेवर दगड मारण्याचे खरंच प्रयत्न करावे, यानिमित्ताने आम्ही त्यांना त्यांची क्षमता तपासण्याची संधी देत आहोत. आणि गुलाबराव पाटील यांचं स्वागतच आहे’, असेही त्यांनी खोचकपणे म्हटले आहे.

Published on: Apr 23, 2023 09:04 AM