MVIA Meeting | हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची विधानभवनात बैठक होणार
अधिवशनाच्या आधी महाविकास आघाडीने तातडीची बैठक बोलवली आहे. उद्या सकाळी 9 वाजता अधिवेशाला सुरूवात होण्यासाठी ही बैठक पार पडणार आहे.
मुंबई : उद्यापासून राज्याच्या विधानभवनात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात न होता, मुंबईतच होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे अधिवेशन मुंबईतच घेत असल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. याच अधिवशनाच्या आधी महाविकास आघाडीने तातडीची बैठक बोलवली आहे. उद्या सकाळी 9 वाजता अधिवेशाला सुरूवात होण्यासाठी ही बैठक पार पडणार आहे.
अधिवेशनात हे मुद्दे गाजण्याची शक्यता
राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, त्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे हाच मुद्दा अधिवेशनातही गाजण्याची शक्यता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, राज्यात सुरू असलेला परीक्षांचा घोळ आणि पेपरफुटी, हाही मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडून वारंवार परीक्षा घोळाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावरूनच जोरदार घमासान पहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच दारू आणि पेट्रोलवरील टॅक्सचा मुद्दाही या हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सुरू असलेला एसटीच्या संपाचा मुद्दाही चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. कारण कालच अजय गुजर यांनी संप मागे घेतला आहे, तर काही भागातील एसटी कर्मचारी अजूनही विलीकरणावर ठाम आहेत, त्यामुळे या मुद्द्यावरूनही विरोधक सरकारला घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येऊ शकतात.