मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर बिनशर्त पाठिबा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोघे एकाच व्यासपीठावरून महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा घेणार आहे.
मुंबईत आज दोन मोठ्या महाजाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र सभा घेणार आहे. त्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर बिनशर्त पाठिबा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोघे एकाच व्यासपीठावरून महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा घेणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतील बीकेसी येथे इंडिया आघाडीची देखील जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जून खर्गे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित राहणार आहेत. तर जामिनावर तुरूंगातून सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल हे बीकेसी येथील या जाहीर सभेला हजर राहणार आहेत. दरम्यान, या दोन्ही महाजाहीर सभेची तयारी नेमकी कशी सुरू आहे? शिवाजीपार्क येथील महायुतीच्या सभेचे काय आहेत अपडेट बघा व्हिडीओ