धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण माझ्यासाठी....'

धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, ‘आज माझी बहीण माझ्यासाठी….’

| Updated on: Oct 24, 2024 | 4:15 PM

'कोणतीही निवडणूक असली तरी मी ती सहज घेत नाही... लढाई ही लढाई असते. या लढाईमध्ये आपण संपूर्णपणे झोकून देऊन विजय प्राप्त करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे.. लोकसभेमध्ये आम्ही बहिण-भाऊ एकत्र होतो. पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघातून 75 हजाराची लीड मिळाली म्हणून मी ही निवडणूक सहजपणे घेणार नाही.. ', असे धनंजय मुंडे म्हणाले.

महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी गुरुवारी परळी विधानसभा मतदारसंघातून आपला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन न करता विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरणे पसंत केले. धनंजय मुंडे यांनी बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत विधानसभेकरता उमेदवारी अर्ज दाखल केला. परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘यंदा पंकजा मुंडे यांच्यासोबत मी स्वतः माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. पंकजाताई या उमेदवार असताना मी त्याचा सूचक होतो, त्यावेळी मी त्यांना घरी घ्यायला गेलो होतो आणि आज तोच क्षण… आज माझी बहीण माझ्यासाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आली. हा वेगळाच आनंद आहे.’, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

Published on: Oct 24, 2024 04:15 PM