Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर?

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर?

| Updated on: Dec 16, 2024 | 4:28 PM

नागपुरात रविवारी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये महायुतीच्या ३९ जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक १९ तर शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले

रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या ११ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. नागपुरात रविवारी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये महायुतीच्या ३९ जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक १९ तर शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात आधी मंत्री असलेल्या अनेक बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. तानाजी सावंत यांच्याकडे गेल्यावेळी आरोग्य खातं होतं. मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. यासोबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. तर सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेच्या कामकाजात अनुपस्थित राहिले. यासोबतच छगन भुजबळ, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोडेंकर, रवी राणा हे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापैकी मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी काल उघड नाराजी व्यक्त केली होती. भोंडेकर यांच्याप्रमाणाचे विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि तानाजी सावंत हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे, विजय शिवतारे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

Published on: Dec 16, 2024 04:28 PM