महायुती Vs मविआ? लोकसभेत कुणाविरूद्ध कोण लढणार? महायुतीचं ठरलं, मविआकडून कोण?

महायुती Vs मविआ? लोकसभेत कुणाविरूद्ध कोण लढणार? महायुतीचं ठरलं, मविआकडून कोण?

| Updated on: Mar 16, 2024 | 10:53 AM

लोकसभा निवडणुकीकरता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बाजूने जे-जे उमेदवार जाहीर झालेत त्यांच्या विरोधात कुणाची नावं चर्चेत आहेत, जाणून घ्या.... लोकसभेत कुणाविरूद्ध कोण लढणार? महायुतीचं ठरलं, मविआकडून कोण?

मुंबई, १६ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकीकरता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बाजूने जे-जे उमेदवार जाहीर झालेत त्यांच्या विरोधात कुणाची नावं चर्चेत आहेत, जाणून घ्या…. धाराशिव लोकसभेत ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात महायुतीचे शिवसेनेचे तानाजी सावंत किंवा त्यांचे पुतणे धनंजय सावंत, अजित दादा गटाचे सुरेश बिराजदार तर भाजपकडून राणाजगजितसिंह पाटील आणि प्रवीणसिंग परदेशी यांची नावं चर्चेत आहे. धाराशीवलोकसभेत औसा, धाराशीव, उमरगा, भूम-परांडा, तुळजापूर आणि बार्शी असे विधानसभा येतात. येथे गेल्या वर्षी ओमराजे निंबाळकर यांचा विजय झाला होता. नाशिक लोकसभेत मविआकडून ठाकरे गटाचे विजय करंजकर यांच्या विरोधात शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्या सह भाजपचे शांतीगिरी महाराज हे सुद्धा दावा करताय. नाशिक लोकसभेमध्ये सिन्नर, देवळाली, इगतपुरी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य असे विधानसभा येतात. गेल्यावर्षीच्या निवडणुकीत हेमंत गोडसे विरूद्ध समीर भुजबळ यांच्या लढत झाली होती. त्यावेळी हेमंत गोडसे हे विजयी झाले होते. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 16, 2024 10:53 AM