गोंदियात लोकांनी नारे देत का काढला कॅन्डल मार्च? ‘काय’ आणि ‘कोण’ आहे कारण?

| Updated on: May 14, 2023 | 9:35 AM

आता हे आंदोलन अधिक तिव्र झालं असून महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला युनायटेड किसान मोर्चाने पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर युनायटेड किसान मोर्चा बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी ११ त १८ मे या कालावधीत देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

गोंदिया : गेल्या बाविस दिवसांपासून दिल्लीत महिला कुस्तीपटुंचे (Wrestler Protest) दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरु आहे. महिला कुस्तीपटुंनी ब्रिजभूषण सिंह (Brijhushan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. तसेच जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. आता हे आंदोलन अधिक तिव्र झालं असून महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला युनायटेड किसान मोर्चाने पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर युनायटेड किसान मोर्चा (United Kisan Morcha) बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी ११ त १८ मे या कालावधीत देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. याचदरम्यान राज्यातील गोंदिया येथे देखिल लोक रस्त्यावर उतरले आहेत. गोंदियातील खेळाडू व सामाजिक संघटनांनी येथील नेहरू चौक येथे कॅण्डल मार्च काढत दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला समर्थन दिलंआहे. या वेळी ब्रिजभूषणसिंह यांच्या विरोधात नारे बाजी करण्यात आली. तसेच ब्रिजभूषणसिंह यांना पदावरून काढून त्यांना अटक करण्यात यावी. तसेच कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

असं काय घडलं की, अकोल्यात दोन गट आले आमने-सामने अन् झाली तुफान हाणामारी
भाजप नेत्यावरील ED कारवाई दाखवा अन् १ लाख मिळवा, कुणी कुठं केली बॅनरबाजी?