AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, पाच पर्यटक बुडाल्याने खळबळ, दोघांचा मृत्यू

तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, पाच पर्यटक बुडाल्याने खळबळ, दोघांचा मृत्यू

| Updated on: Feb 22, 2025 | 5:01 PM

सिंधुदुर्गाच्या मालवण तालुक्यातील तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले पाच पर्यटक अचानक बुडाल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणांपैकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मालवण तालुक्यातील तारकर्ली बिचवर मोठा दुर्घटना घडली असून पर्यटनासाठी आलेल्या तरुणांपैकी पाच तरुण बुडाल्याचे म्हटले जात आहे. या पाच तरुणांपैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे तर दोघा जणांना वाचविण्यात यश आले आहे. तिघांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. कोकणात विकेण्डसाठी पर्यटकांची मोठी गर्दी असून तारकर्ली बिच हा प्रसिद्ध पिकनिक पॉईंट आहे. येथे पुण्याच्या हडपस येथून फिरायला आलेल्या पाच पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणांना पाण्याचा कोणताही अंदाज नसताना देखील ते खोल समुद्रात उतरले होते. ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे यांना लाटेने आत खेचून नेले. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली परंतू रोहित बाळासाहेब कोळी (वय २१), शुभम सुनील सोनवणे (वय २२) यांचा मृत्यू झाला. तर हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), ओंकार अशोक भोसले (वय २४) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक परंतू स्थिर आहे.

Published on: Feb 22, 2025 04:54 PM