VIDEO : Ajit Pawar LIVE | अतिवृष्टीचा कोल्हापूर, सांगलीला मोठा फटका, अनेक वर्गाचं मोठं नुकसान – अजित पवार
महाराष्ट्रातील जनतेनेही 9 जिल्ह्याच्या मदतीसाठी पुढं आलं पाहिजे. दानशूरांनी सढळ हस्ते मदत करावी, असं आमचं आवाहन आहे, असं अजित पवार यांनी केलं.
अजित पवार यांनी आज कोल्हापुरात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी परिस्थितीची माहिती देतानाच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. जो पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. तो पर्यंत पॅकेजची घोषणा करता येणार नाही. आता तातडीची मदत सुरूच आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही 9 जिल्ह्याच्या मदतीसाठी पुढं आलं पाहिजे. दानशूरांनी सढळ हस्ते मदत करावी, असं आमचं आवाहन आहे, असं अजित पवार यांनी केलं. तसेच अजित पवार म्हणाले की, अतिवृष्टीचा कोल्हापूर, सांगलीला मोठा फटका बसल्या असून अनेक वर्गाचं मोठं नुकसान झालं आहे.
Latest Videos