Sindhudurg | सुमद्रकिनारी पसरली फेसाची बर्फाळ चादर

Sindhudurg | सुमद्रकिनारी पसरली फेसाची बर्फाळ चादर

| Updated on: Jun 18, 2021 | 2:44 PM

गेल्या दोन दिवस कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात समुद्रकिनारी लाटांचं तांडव सुरु होतं. मात्र गेल्या काही तासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मालवण समुद्र किनारी निसर्गाचा अद्भूत नजारा पाहण्यास मिळत आहे.

गेल्या दोन दिवस कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात समुद्रकिनारी लाटांचं तांडव सुरु होतं. मात्र गेल्या काही तासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मालवण समुद्र किनारी निसर्गाचा अद्भूत नजारा पाहण्यास मिळत आहे.  सिंधुदुर्गातील रॉक गार्डन येथील किनारपट्टी भागात फेसाळ पाण्याची मखमली चादर पसरली आहे. त्यामुळे एक अनोखं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्राच्या जोरदार लाटा किनारपट्टी धडकत होत्या. त्यातूनच हा नयनरम्य नजराणा तयार झाला. फेसाळ पाण्याने जणू बर्फ पडावा अथवा कापूस पिंजावा अशी मखमली चादर या किनाऱ्यावर पसरली आहे. कोरोना काळ असल्याने सध्या सिंधुदुर्गात पर्यटकांवर निर्बंध लावण्यात आले आहे. अन्यथा निसर्गाचा हा नयनरम्य नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली असती. मात्र सध्या स्थानिक या नजाऱ्याचा लाभ घेत आहेत.