मुंबईच्या मालवणी भागात घरफोडी करून पळणारा चोरटा CCTVमध्ये कैद

| Updated on: Apr 13, 2022 | 11:24 PM

दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल रज्जाक मुनाफ अन्सारी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 5 लाख 51 हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या चोरीबद्दल ज्यांनी तक्रार केली आहे, ते तक्रारदार हे मालवणी परिसरात राहतात.

दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल रज्जाक मुनाफ अन्सारी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 5 लाख 51 हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या चोरीबद्दल ज्यांनी तक्रार केली आहे, ते तक्रारदार हे मालवणी परिसरात राहतात. गेल्या महिन्यात ते कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी गुजरात येथे गेले होते. तेव्हा अब्दुलने घरफोडी करून 5 लाख 71 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढला होता.

ज्या दिवशी ते घरी आले त्यादिवशी त्यांच्या घराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसला. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यानी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी मालवणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला. घराचा दरवाजा तोडून चोरी झाल्याची तक्रार केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक हसन मुलांनी, मोरे, शिंदे, भंडारे, वत्रे, खांडवी, आमटे आदी पथकाने तपास सूर केला.

Special Report | Mumbai ते Osmanabad पर्यंत Nawab Malik यांची संपत्ती जप्त -tv9
शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणाचं नागपूर कनेक्शन, संदीप गोडबोले पोलिसांच्या ताब्यात