पक्ष प्रवेश करताच नगरसेवकांना 5 कोटी निधीचं गिफ्ट? मुंबई महापालिकेत चाललंय काय?

पक्ष प्रवेश करताच नगरसेवकांना 5 कोटी निधीचं गिफ्ट? मुंबई महापालिकेत चाललंय काय?

| Updated on: Feb 02, 2024 | 10:52 AM

उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या तीन नगरसेवकांना मुंबई महापालिकेने प्रत्येकी पाच कोटींचा निधी मंजूर केलाय. विशेष म्हणजे यापैकी बहुतांशी नगरसेवकांना पक्षप्रवेशाच्या काहीच दिवसांत निधी मिळाल्याचे इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात म्हटलंय. शिंदे गटात गेलेल्या ३० नगरसेवकांना आकस्मिक निधी म्हणून प्रत्येकी ५ कोटी रूपये?

मुंबई, २ फेब्रुवारी, २०२४ : मुंबई महापालिकेचा कारभार पुन्हा एकदा वादात सापडलाय. उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या तीन नगरसेवकांना मुंबई महापालिकेने प्रत्येकी पाच कोटींचा निधी मंजूर केलाय. विशेष म्हणजे यापैकी बहुतांशी नगरसेवकांना पक्षप्रवेशाच्या काहीच दिवसांत निधी मिळाल्याचे इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात म्हटलंय. शिंदे गटात गेलेल्या ३० नगरसेवकांना आकस्मिक निधी म्हणून प्रत्येकी ५ कोटी रूपये देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेत चाललंय काय? हा प्रश्न तुम्हाला इंडियन एक्स्प्रेसने छापलेल्या बातमीतून पडू शकतो. मुंबईसह जवळपास महाराष्ट्रातील सर्वच महापालिकांमध्ये प्रशासक आहे. दोन वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. तरी ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांना अशाप्रकारचा निधी मंजूर करण्यात आलाय. योगायोग म्हणजे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या १५ दिवसातच ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Feb 02, 2024 10:52 AM