Manda Mhatre | नवी मुंबई विमानतळ नामकरण, आम्ही आमचा अधिकार मागतोय, विरोध नाही – मंदा म्हात्रे
नवी मुंबईच्या तांडेल मैदानात आंदोलनकर्त्यांची गर्दी जमायला सुरवात झाली आहे. विरारहून बस, ऑटो, गाड्यांमधून झेंडे आणि फलक घेऊन कोळी-आग्री बांधव दाखल झाले आहेत. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव द्या, या मागणीसाठी समाज एकवटल्याचं पाहायला मिळतंय.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वादाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फौजफाटा वाढवला आहे. जवळपास तीन हजार पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी आहेत.
नवी मुंबईच्या तांडेल मैदानात आंदोलनकर्त्यांची गर्दी जमायला सुरवात झाली आहे. विरारहून बस, ऑटो, गाड्यांमधून झेंडे आणि फलक घेऊन कोळी-आग्री बांधव दाखल झाले आहेत. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव द्या, या मागणीसाठी समाज एकवटल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलनासाठी स्पेशल टि शर्ट आणि मास्क बनविण्यात आले आहेत. आजच्या आंदोलनासाठी नागरिकांमध्ये ते वाटण्यातही आले आहेत.