मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानानंतर मंगेश कुडाळकर यांचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज, आम्ही स्वीकारतो पण...

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानानंतर मंगेश कुडाळकर यांचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज, आम्ही स्वीकारतो पण…

| Updated on: Feb 05, 2023 | 8:32 AM

मंगेश कुडाळकर यांचं चॅलेंज, आदित्य ठाकरे कोणती भूमिका घेणार? चॅलेंज स्वीकारणार की प्रत्युत्तर देणार?

मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज केलं आहे. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले होते. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्यापेक्षा वरळी मतदारसंघात चांगलं काम करून दाखवावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले वरळीतील चॅलेंज आम्ही स्वीकारतो पण कुर्ल्यात येऊन त्यांनी माझ्या विधानसभेत निवडणूक लढवून दाखवावं’, असे म्हणत मंगेश कुडाळकर यांनी ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांना दिले आहे. मंगेश कुडाळकर यांच्या चॅलेंजनंतर आदित्य ठाकरे कोणती भूमिका घेतात की त्यांना प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Feb 05, 2023 08:32 AM