राहुल कनाल शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर, मनीषा कायंदे म्हणतात, “आमच्यासारखं कनाल यांना …”

| Updated on: Jun 30, 2023 | 4:52 PM

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. राहुल कनाल उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राहुल कनाल यांच्या जाण्याने ठाकरे गटाच्या युवासेनेला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या आमदार मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. राहुल कनाल उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राहुल कनाल यांच्या जाण्याने ठाकरे गटाच्या युवासेनेला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या आमदार मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रमुखांना भेटता येत नव्हतं. काही बोलता येत नव्हतं, त्यामुळे माझी खंत होती. असंचं काहीसं कारण राहुल कनाल यांचं असेल. त्यामुळे ते ठाकरेंना सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्या संदर्भात आता चिंतन करण्याची गरज आहे,” असं मनीषा कायंदे म्हणाले.

Published on: Jun 30, 2023 04:52 PM
“नेते झाले म्हणून अन्याय झाला का?”, राहुल कनाल यांच्या प्रश्नावर वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया
“मी सर्वसमावेशक चेहरा म्हणून माझ्याकडे सर्वजण पाहत आहेत”, बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं सूचक विधान