मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक, उपोषणाचा इशारा देत सरकारला धरलं धारेवल

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक, उपोषणाचा इशारा देत सरकारला धरलं धारेवल

| Updated on: Dec 25, 2023 | 10:43 AM

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. २० जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. मात्र यासाठी ३ कोटी मराठे आणि १० लाख गाड्या धडकणार असल्याचा दिला इशारा

मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. २० जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. मात्र यासाठी ३ कोटी मराठे आणि १० लाख गाड्या धडकणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाची वेळ येणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मराठा समाज आपल्या मुलांसाठी कुणाचाही सुपडा साफ करू शकतो, असा हल्लाबोलही जरांगेंनी सरकारवर केलाय तर यावेळी त्यांनी मराठा नेत्यांवरही टीकास्त्र डागलंय. तर २० जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाकरता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलंय. ते म्हणाले, कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घ्या. कोणी दंगा करत असले तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. आंदोलना येताना शिधा सोबत ठेवा. पोलिसांना सहकार्य करा, सरकारला करायची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Dec 25, 2023 10:43 AM