‘मी आंदोलनाला बसलो तर आता उठणार नाही’, जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दम भरत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करत पुन्हा एकदा फटकारल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणासंदर्भात मार्ग काढावा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर मराठे ओबीसी समाजात गेले कुणी काही करू शकलं नाही. मी उद्या एकदा आंदोलनाला बसलो तर आता उठणार नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दम भरत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करत पुन्हा एकदा फटकारल्याचे पाहायला मिळाले. भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची झुंडशाही सुरू आहे. ओबीसी समाजाचं जे नुकसान व्हायचंय ते झालंय असं भाजप नेते आणि ओबीसी नेते गोपीचंड पडळकर यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
Published on: Feb 09, 2024 06:29 PM
Latest Videos