मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणताय, ही मागणी कोणत्याच मराठ्यांची नव्हती
महायुती सरकारने मराठ्यांना ओबीसीऐवजी स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय घेतला आणि मनोज जरांगे पाटील भडकले. सगसोयऱ्यांचा कायदाच करायचा नव्हता कर अधिवेशन घेऊन फसवणूक केली असा गंभीर आरोप त्यांनी करत एकच हल्लाबोल केला
मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४ : विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांचा कायदा होईल, अशी मनोज जरांगे पाटील यांची अपेक्षा होती. मात्र सरकारने स्वतंत्र आरक्षणाचा कायदा केला. तर यावरून मनोज जरांगे पाटील सरकारवर चांगलेच भडकले असून सरकारवर फसवणुकीचाही आरोपही केला. महायुती सरकारने मराठ्यांना ओबीसीऐवजी स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय घेतला आणि मनोज जरांगे पाटील भडकले. सगसोयऱ्यांचा कायदाच करायचा नव्हता कर अधिवेशन घेऊन फसवणूक केली असा गंभीर आरोप त्यांनी करत एकच हल्लाबोल केला. दरम्यान, नोंद नसलेल्या व्यक्तीने गणगोतातील सगेसोयरे असल्याचं प्रतिज्ञापत्र देऊन आरक्षण मिळणार असी अधिसूचनेत सगेसोयऱ्यांची व्याख्या आहे. म्हणजे असं झाल्यास जरांगेंच्या म्हणण्यानुसार सरसकट आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. बघा स्पेशल रिपोर्ट, नेमकं मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
Published on: Feb 21, 2024 10:57 AM
Latest Videos