कुणाच्या मागे कोण? आरक्षण मोर्चावरून नवं रण, मनोज जरांगे पाटील अन् गुणरत्न सदावर्ते आमने-सामने

कुणाच्या मागे कोण? आरक्षण मोर्चावरून नवं रण, मनोज जरांगे पाटील अन् गुणरत्न सदावर्ते आमने-सामने

| Updated on: Oct 15, 2023 | 8:04 AM

tv9 Marathi Special Report | आरक्षण मोर्च्यांवरून कोणामागे कोण आहेत असे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस याचं पिल्लू असलेल्या सदावर्तेंना समज देण्याचं आवाहन जरांगे यांनी केलंय तर शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांचे पॉलिटिकल बॉस असल्याचा सदावर्तेंनी केला आरोप

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | आरक्षण मोर्च्यांवरून कोणामागे कोण आहेत असे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण मिळूच शकत नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यावरून सरकारनं सदावर्ते यांना आवरावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केलंय. दरम्यान, राज्य सरकार प्रत्येक समाजाला आरक्षण देणार असल्याचे म्हणत आश्वस्त करतंय. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही, असा दावा करताय. त्यावरून देवेंद्र फडणवीस याचं पिल्लू असलेल्या सदावर्तेंना समज देण्याचं आवाहन जरांगे यांनी केलंय तर शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांचे पॉलिटिकल बॉस असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केलाय. बघा काय म्हणाले सदावर्ते काय आहे त्यांची भूमिका?

Published on: Oct 15, 2023 08:04 AM