मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नेत्यांना गावबंदी अन् विरोध कायम, आंदोलकांनी दिल्या ‘चले जाओ’च्या घोषणा
tv9 Marathi Special Report | सलग पाचव्या दिवशी विरोधकांच्या नेत्यांची गावा-गावात वाहन अडवण्याचे सत्र सुरूच आहेच. मराठा आंदोलकांनं गाडीसमोर झोपून वाहन आडवलं आणि घोषणाबाजी केली. अनेक नेत्यांना आपले दौरे यामुळे रद्द करावे लागले, बघा कुठं झाला तीव्र विरोध
मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ | सलग पाचव्या दिवशी विरोधकांच्या नेत्यांची गावा-गावात वाहन अडवण्याचे सत्र सुरूच आहेच. दौंडमध्ये संजय राऊत यांना मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागलाय. तर हिंगोलीमध्ये शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आंदोलकांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. मराठा आरक्षणावरून नेत्यांना विरोधाची मालिका सुरूच आहे. पुण्यात आलेल्या संजय राऊत यांना दौंड येथे मराठा आंदोलकांनी घेरलं चले जाओच्या घोषणा केल्या. राऊत ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्याबाहेरच मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली त्यामुळे तब्बल ६ तासांनी संजय राऊत हॉटेलमध्येच थांबावं लागलं. कोल्हापुरात शिंदे गटाचे आमदार संजय मंडलिक आणि अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांची गाडी आडवण्यात आली. मराठा आंदोलकांनं गाडीसमोर झोपून वाहन आडवलं आणि घोषणाबाजी केली. अनेक नेत्यांना आपले दौरे आणि कार्यक्रम यामुळे रद्द करावे लागले, बघा कुठं झाला तीव्र विरोध