अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करण्याचं भुजबळांचं स्वप्न; जरांगे पाटलांचा घणाघात

अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करण्याचं भुजबळांचं स्वप्न; जरांगे पाटलांचा घणाघात

| Updated on: Feb 04, 2024 | 4:34 PM

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न छगन भुजबळ करत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर छगन भुजबळ हे स्वतःच्या सरकारवर शंका उपस्थित करत आहे. असा हल्लाबोलही मनोज जरांगे पाटील यांनी केला

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी सुरू आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न छगन भुजबळ करत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर छगन भुजबळ हे स्वतःच्या सरकारवर शंका उपस्थित करत आहे. असा हल्लाबोलही मनोज जरांगे पाटील यांनी केला तर मराठा कुणबी नोंदींवरून दिशाभूल करण्याचं काम सुरू असल्याचे म्हणत अनेक नोंदीवर खाडाखोड असल्याचे समोर आले आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा भाष्य करत मनोज जरांगे पाटलांना डिवचलं आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलत असताना छगन भुजबळ यांनी ही टीका केली होती. त्यावरच मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Published on: Feb 04, 2024 04:34 PM