मनोज जरांगे यांची पुण्यात मोठी सभा, आरक्षणावरून काय केला मोठा खुलासा?
tv9 Marathi Special Report | जरांगे पाटलांची 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबरला संपतेय. त्याआधी 22 ऑक्टोबरला जरांगे पाटील पुढची दिशा ठरवणार आहेत. मात्र 24 ऑक्टोबरच्या आधीच मराठा समाजाला सरसकट कुणबीतून आरक्षण मिळेल असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय
मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील 22 तारखेला आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. त्याआधी त्यांची पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये दुसरी सभा झाली. महिन्याभराची मुदत देताना, मराठा आरक्षणावरुन सरकारशी काय बोलणं झालं? हेही जरांगे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीनंतर पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये दुसरी सभा घेतली. इथंही 100 एकरावर मनोज जरांगेंनी भव्य सभा घेतली आणि महिन्याभराची मुदत देताना सरकारसोबत टिकणारं आरक्षण देण्याचं ठरलेलं आहे, अशी माहिती जरांगेंनी उघड केली. जरांगे पाटलांची 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबरला संपतेय. त्याआधी 22 ऑक्टोबरला जरांगे पाटील पुढची दिशा ठरवणार आहेत. मात्र 24 ऑक्टोबरच्या आधीच मराठा समाजाला सरसकट कुणबीतून आरक्षण मिळेल असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Oct 21, 2023 11:49 AM
Latest Videos