सगेसोयऱ्यांचा कायदा होईपर्यंत चक्काजाम, जरांगेंकडून नव्या आंदोलनाची घोषणा; सरकारला फुटणार घाम?
२४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्तारोको करण्याची घोषणा जरांगेंनी केली. सगेसोयऱ्यांच्या कायद्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारसमोर नवं आव्हान उभं केलंय. सगेसोयऱ्यांचा कायदा न केल्याने जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय.
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतरही जरांगे पाटील यांनी नवं आंदोलन पुकारलं आहे. २४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्तारोको करण्याची घोषणा जरांगेंनी केली. सगेसोयऱ्यांच्या कायद्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारसमोर नवं आव्हान उभं केलंय. सगेसोयऱ्यांचा कायदा न केल्याने जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. २४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात शहरं आणि गावांत रास्ता रोको आंदोलन होणार, ३ मार्चला सर्व जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाचवेळी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान भव्य रास्ता रोको, आंदोलनात वयस्कर व्यक्तींनाही सहभागी होणाऱ्यांचं जरांगेंचं आवाहन, मंत्री आणि आमदारांना प्रचारासाठी आल्यास दारात घेऊ नये, गाड्या ताब्यात घ्या..असे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सांगितलं. बघा नेमकी कशी असणार मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा….