‘मोक्का लागणार अन् सर्व जेलमध्ये जाणार’, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केले आहे. या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळ्यांचे सगळे जेल मध्ये जाणार आहेत आणि सगळ्यांना मोक्का सुद्धा लागणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराडने तब्बल २२ दिवसांनंतर शरणागती पत्करली. त्याच्या तपासासाठी सीआयडीची नऊ पथके त्याचा शोध घेत होती. या पथकात १५० अधिकारी आणि कर्मचारी होते. परंतु तो पोलिसांना काही मिळाला नाही. अखेर त्याने स्वतः पोलिसांपुढे सरेंडर केले. या प्रकरणावर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही जण फरार आहेत. फरार असणाऱ्या आरोपींना कुणी फरार केलं हे चौकशीमध्ये समजणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ‘आता चौकशी सुरू होईल. आता काही आणखी फरार आहेत. त्यांचे सीडीआर घेतले जातील. त्यांच्या सगळ्या कॉल डिटेल्सवर लक्षात येईल कोण याच्या पाठीशी आहे. खंडणी कोणी मागितली, कुणी मागायाला लावली, कुणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कुणी आणि सांभाळतायेत कोण? या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळ्यांचे सगळे जेल मध्ये जाणार आहेत आणि सगळ्यांना मोक्का सुद्धा लागणार आहे. 302 मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामुहिक कट असू शकतो, असेही मनोज जरांगे म्हणाले.