Manoj Jarange : ‘भिकार साले…’, लक्ष्मण हाकेंच्या जीवे मारण्याच्या धमकीवर जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
आलेल्या धमकीवर लक्ष्मण हाकेंनी पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांना आलेल्या धमकीवर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना धमकी देण्यात आल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय. लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आरोपामुळे एकच चर्चा सुरू झालीये. इतकंच नाहीतर लक्ष्मण हाके यांनी धमकी आल्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके हे फोनवर बोलतांना दिसताय. तर फोनवरील समोरचा माणूस त्यांना धमकी देत असल्याचे दिसत आहे. यामध्ये असं म्हटलंय, उठसूठ तुम्ही मराठ्यांना बोलताय, मनोज जरांगेंना बोलताय.. यावर लक्ष्मण हाकेंकडूनही उत्तर देण्यात आलंय. मनोज जरांगे यांनीही स्वत:चं घरदार बघाव ना. त्यावर समोरच्या माणसाने त्यांच्यावर शिव्यांचा भडिमार करत तुमची तेवढी लायकी नाही, अशा शब्दांत आलेल्या धमकीवर लक्ष्मण हाकेंनी पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांना आलेल्या धमकीवर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘जाय तिकडे.. भिकार साले…’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.