आमचं नाही तर छगन भुजबळांचं शेपूट वाढत चाललंय, जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं?
'सगसोयऱ्यांना पहिले विरोध नाही असे म्हणाले होते. आता म्हणतात सरसकट मिळालं नाही पाहिजे. जे मराठ्यांना हवंय ते त्याला पाहिजे', असे म्हणत भुजबळांवर मनोज जरांगे पाटलांनी टीका केली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाचं नाहीतर छगन भुजबळ यांचं शेपूट वाढत चाललंय असं म्हणत मनोज जरांगे पाटलांना भुजबळांवर निशाणा साधला. ‘सगसोयऱ्यांना पहिले विरोध नाही असे म्हणाले होते. आता म्हणतात सरसकट मिळालं नाही पाहिजे. जे मराठ्यांना हवंय ते त्याला पाहिजे’, असे म्हणत भुजबळांवर मनोज जरांगे पाटलांनी टीका केली. सगेसोयरे म्हणजे काय आणि त्याची अमलबजावणी कशी करायची हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून मनोज जरांगे लढणार आहे. तुम्ही आरक्षण घालवलं तर मी सोडणार नाही, असे म्हणत जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. धनंजय मुंडे म्हणाले होते, मागेल त्याला द्यायचं म्हणत असाल तर सरसकटच राहिलं काय? नंतर मी म्हणालो सरसकट द्या, असे म्हणत मनोज जरांगे पाटील पुन्हा सगेसोयऱ्यांवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले.