‘ते येडं झालंय, मोठ्या हात्यकांडांचा सूत्रधार तसा तो…’, एकेरी उल्लेख करत जरांगे पाटलांचं दरेकरांवर टीकास्त्र
मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे, या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहे. अशातच ७ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यादरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली देखील सुरू आहे. बघा काय म्हणाले जरांगे?
मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्रात शांतता रॅली सुरू आहे. मात्र या रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधत त्यांना टार्गेट केलंय. प्रवीण दरेकर वेडे झाले आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. इतकंच नाहीतर प्रवीण दरेकर हे आंदोलनं फोडणारे मुख्य सूत्रधार असल्याची घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. प्रवीण दरेकर यांनी एका क्रांती मोर्चाचे तीन क्रांती मोर्चे केलेत, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. या टीकेनंतर प्रवीण दरेकर यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर पटलवार केल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली नाही तर ती समाजात द्वेष पसरवणारी रॅली आहे, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.