तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, एकेरी उल्लेख करत जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर आले आहेत. गेले पाच दिवस अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आमरण उपोषण सुर आहे. यावेळी त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केली.
मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असताना त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आमचं आंदोलन सुरू असताना राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं. शाळेत गेलो तरी तिथं जातीयवाद गेल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. आता जातीयवाद कोण करतोय? मुलांना भुजबळ समर्थकांनी काय बोलायचं ते शिकवलं होतं. जातीवादच नाही का? आम्ही काहीही केलं नाही. तरी शाळेपर्यंत जातीयवाद गेला असं सांगितलं गेलं. त्याचा कळवळा राज ठाकरेंना आला, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. पुढे मनोज जरांगे पाटील असेही म्हणाले, आमचा रस्ता बंदच केला. हेच आम्ही केलं असतं तर मराठ्यांनी गरीब जातींना वाळीत टाकलं असं म्हटलं असतं. हेच आम्ही केलं असतं तर असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचा एकेरी उल्लेख केला. महान योग गुरू, आयुर्वेदाचार्य छगन भुजबळ यांनी थयथयाट केला असता. एखाद्या नाच्यासारखा थयथयाट झाला असता. माझ्या ओबीसीला त्रास दिला असं म्हटलं असतं. आम्ही केलं असतं तर आमच्या जातींना वाळीत टाकलं म्हटलं असतं, असं मनोज जरांगे म्हणाले. आमचा रस्ता बंद केला. पाटातून जा म्हणतात. गावातून जाऊ नका असं आम्हाला सांगत आहेत. पूर्वी बौद्धांचं जसं शोषण झालं तसं आमचं झालं. बौद्धांना जसं वाळीत टाकलं जात होतं, तसं आमचं होतंय. दवाखाना, शाळा आणि कॉलेजात जायचे आमचे रस्ते बंद केले आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.