म्हातारपणात एका व्यक्तीला काहीच सूचत नाही, मनोज जरांगे यांनी नाव न घेता भुजबळ यांना सुनावलं

म्हातारपणात एका व्यक्तीला काहीच सूचत नाही, मनोज जरांगे यांनी नाव न घेता भुजबळ यांना सुनावलं

| Updated on: Nov 21, 2023 | 1:55 PM

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. जालन्यातील अंबड येथे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेवर आता जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौऱ्यातून सडकून टीका करत पलटवार केलाय

ठाणे, २१ नोव्हेंबर २०२३ : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. जालन्यातील अंबड येथे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेवर आता जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौरा सुरू असताना, त्यातील सभेतून पलटवार केलाय. म्हातारपणात एका व्यक्तीला काहीच सूचत नाही, मी कोणाचं नाव घेतलं नाही, त्यांचं नाव घेण्याची लायकी नाही. अशी टीका त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता केली आहे. तर मला छगन भुजबळ यांच्या बद्दल संगळं माहित आहे. येत्या २४ नोव्हेंबरला मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, मराठ्यांसाठी तो सोन्याचा क्षण असणार आहे. म्हणून मी शांत आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हणत छगन भुजबळ यांच्यावर जोरदार घणाघात केला.

Published on: Nov 21, 2023 01:55 PM