लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगे पाटलांचा रोख नेमका कोणावर?

लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगे पाटलांचा रोख नेमका कोणावर?

| Updated on: Apr 22, 2024 | 2:51 PM

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचा निर्णयानंतर मनोज जरांगे पाटलांनी पुण्यातील भोरमधून छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची येत्या ८ जून रोजी भव्य सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेची जय्यत तयारी मराठी समर्थकांकडून सुरू आहे. अशातच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचा निर्णयानंतर मनोज जरांगे पाटलांनी पुण्यातील भोरमधून छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?..दिसत नाही अजून.. बर्फात जाऊन झोपला का कायं हिमालयात?’, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर घणाघाती टीका केली आहे.

Published on: Apr 22, 2024 02:51 PM