आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल
जेव्हा पहिल्यांदा छगन भुजबळांनी ओबीसी सभा सुरू केल्यात तेव्हा आंबेडकरांनी फडणवीसांवर आरोप करून भुजबळांद्वारे जाती जातीत भांडणं लावण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. नंतर मात्र आंबेडकर स्वतः ओबीसी मंचावर दिसले. मराठा-ओबीसी वाद कसा सुटेल याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, पण...
राज्यात पुन्हा जाती-जातीत भांडणं लावण्याचा डाव आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे गोड बोलून दुसरीकडे बैठकांद्वारे डाव शिजत असल्याचा आरोपही जरांगेंनी केला आहे. दरम्यान, घाई-घाईत दिलेल्या कुणबी नोंदी रद्द करा आणि सगेसोयऱ्यांची मागणी ही भेसळ आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यानंतर आंबेडकरांच्या या भूमिकेवरही मनोज जरांगेंनी सवाल केले आहेत. जेव्हा पहिल्यांदा छगन भुजबळांनी ओबीसी सभा सुरू केल्यात तेव्हा आंबेडकरांनी फडणवीसांवर आरोप करून भुजबळांद्वारे जाती जातीत भांडणं लावण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. नंतर मात्र आंबेडकर स्वतः ओबीसी मंचावर दिसले. मराठा-ओबीसी वाद कसा सुटेल याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, पण सत्ता आल्याशिवाय आपण सांगणार नाही, असं आंबेडकर म्हणाले.
Published on: Jul 18, 2024 11:37 AM
Latest Videos