Manoj Jarange Patil : कंठ दाटला, डोळे पाणावले… मनोज जरांगे पाटील का झाले भावूक; म्हणाले, ‘लढा थांबता…’
गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षपणे आपले उमेदवार उतरवणार असल्याची अधिकृत भूमिका जाहीर केली होती. जिथे आपले उमेदवार निवडून येऊ शकतात तिथे मराठा समाजाचे उमेदवार उभे करु, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तर इच्छुकांच्या मुलाखती सुरू असताना मनोज जरांगे भावनिक झाल्याचे दिसले.
उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. किती ठिकाणी लढणार हे सांगणार नसून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या आल्यानंतरच उमेदवारांची घोषणा करणार असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. तर मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातील सर्व ४८ मतदारसंघात उमेदवार न देता मराठ्यांची निर्णायक संख्या असलेल्या ठिकाणी उमेदवार देऊ शकतात असंही म्हटलं जातंय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी २४ तास विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदावारांच्या जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मुलाखती घेतल्या आहेत. जालन्यातील इच्छुक असलेल्या उमेदावारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील हे काहिसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. लढा थांबता कामा नये, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवारांना साद दिली. आपल्याच सहकाऱ्यांशी बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?