Manoj Jarange यांच्या उपोषणाचा १४ वा दिवस, ना औषध ना पाणी, सलाईनंतर वैद्यकीय तपासणीली नकार; कशी आहे प्रकृती?
VIDEO | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १४ वा दिवस, आता वैद्यकीय तपासणीला देखील दिला नकार, सध्या कशी त्यांची प्रकृती अन् काय म्हणाले डॉक्टर?
मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली असून अद्याप याच मागणीवर ते ठाम आहेत. सलग गेल्या १४ दिवसांपासून याच मागणीवर ते उपोषण करत आहेत. तर जालन्यात सुरू असलेले त्यांचे उपोषण त्यांनी मागे घ्यावे यासाठी सरकारकडून त्यांची मनधरणी देखील कऱण्यात येत आहे. मात्र मनोज जरांगे पाटील काही केल्या मागे होताना दिसत नाही. दरम्यान, कालपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्यास आणि औषधांचे सेवन करण्याचा त्याग केला आहे. यासोबत आता त्यांनी वैद्यकीय तपासणी किंवा उपचारांना देखील विरोध दर्शविला आहे. त्यांची प्रकृती खालवली असून वैद्यकीय उपचारांनादेखील नकार दिल्याने याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या शरिराची तपासणी करण्यासाठी गेलेल्या डॉक्टारांना त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठीही नकार दिल्याचे सांगितले जात आहे. बघा कशी आहे त्यांची प्रकृती आणि काय म्हणाले डॉक्टर