बैठका अन् सभांचा सपाटा सुरु असताना मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
मराठवाड्यात बैठका आणि सभांचा सपाटा सुरु असताना मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर जरांगे पाटलांनी अनेक सभा आणि रॅली देखील घेतल्या. आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठवाड्यात बैठका आणि सभांचा सपाटा सुरु असताना मनोज जरांगे पाटील यांची आज अचानक तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत. मनोज जरांगे हे गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर जरांगे पाटलांनी अनेक सभा आणि रॅली देखील घेतल्या. आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी याआधी अनेकदा उपोषणाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरलं. मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारने जरांगेंच्या काही मागण्या केल्या. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं. यानंतर जरांगेंवर गॅलेक्सी रुग्णालयातच उपचार करण्यात आले असून आता मनोज जरांगे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.