मनोज जरांगे यांच्यात दिसणारी ‘ही’ लक्षणं चांगली नाहीत, डॉक्टरांनी दिली चिंताजनक माहिती
चौथ्या टप्प्यातील दौऱ्यातील सभा सुरु असताना काल मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा जाणवू लागला आणि त्यांची प्रकृती अचानक खालवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, काल त्यांना अंबेजोगाईच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू
बीड,१२ डिसेंबर २०२३ : राज्यभरात अद्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. तर मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात आता चौथ्या टप्प्याचा दौरा सुरू आहे. चौथ्या टप्प्यातील दौऱ्यातील माकणी आणि मुरुड तसेच बीड जिल्ह्यात त्यांची सभा सुरु असताना काल मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा जाणवू लागला आणि त्यांची प्रकृती अचानक खालवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, काल त्यांना अंबेजोगाईच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर डॉक्टरानी जरांगेची तपासणी केली असता त्यांना नितांत आराम करण्याचा सल्ला दिला. त्यांना विश्रांतीची गरज असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. तर डॉक्टर थोरात यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची माहिती देताना ते म्हणाले, मनोज जरांगे यांची प्रकृती स्थिर नाहीये. सभेत त्यांना चक्कर आली आणि त्यांनी बसूनच सभा केली याचा अर्थ त्यांचा बीपी कमी झाला आहे. तीन दिवसांपासून त्यांना ताप आहे. रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. रिपोर्ट आल्यानंतर सविस्तर जरांगे यांच्या तब्येतीबद्दल सांगता येईल, असेही त्यांनी म्हटले.