मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5 वा दिवस, ना अन्न ना पाणी… नाकातून रक्तस्त्राव; सध्या कशी आहे प्रकृती?
आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसल्यापासून ना अन्न ना पाणी ग्रहण केले आहे
जालना, १४ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांसंदर्भातील कायद्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसल्यापासून ना अन्न ना पाणी ग्रहण केले आहे. त्यामुळे त्यांची तब्येत गंभीर होताना दिसतेय. अशातच त्यांच्या नाकातूनही आता रक्तस्त्राव होत असल्याची माहिती मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर असूनही त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. डॉक्टरांचं पथक अंतरवाली सराटीतील उपोषण स्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी नाडी आणि बीपी तपासणी करण्याचा प्रयत्न केला पण याला जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. बघा सध्या कशी आहे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती?
Published on: Feb 14, 2024 12:53 PM
Latest Videos