‘गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप…’, जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला दोन दिवस झालेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी गुडघे टेकायला लावणार असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा थेट इशारा देत शेवटचं अल्टिमेटम दिलंय. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला गुडघे टेकायला लावणार असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं सहावं आमरण उपोषण सुरू झालंय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैद्रराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा… मनोज जरांगे पाटील यांची मागणी स्पष्ट आहे. मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या… त्यामुळे या आमरण उपोषणातून कोणता मार्ग निघतोय का? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.