Maratha Reservation : जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने…मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करणार की नाही? आंदोलन टळणार?
ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना अद्याप कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे आता ऐकणार नाही, असा पवित्राच जरांगे पाटील यांनी घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई, २० जानेवारी २०२४ : सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेच्या रवाना झाले आहेत. सरकारने जरांगेंकडे आणखी वेळ मागितला पण आणखी वेळ देणार नाही, असं म्हणत मराठ्यांसह मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला कूच केली आहे. दरम्यान, एका समन्वयकाने मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खास व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था केली आहे. तर ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना अद्याप कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे आता ऐकणार नाही, असा पवित्राच जरांगे पाटील यांनी घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. तर फेब्रुवारीमध्ये कायदा करून मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, असाही शब्द दिलाय. यापूर्वी उपोषण सोडताना सरकारचे चार-चार मंत्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आले होते. मग आता हे चार मंत्री कुठे गेलेत? मराठ्यांची फसवणूक करण्यासाठी आले होते का? अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट….