ओबीसींना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, तर छगन भुजबळही उतरले मैदानात

ओबीसींना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, तर छगन भुजबळही उतरले मैदानात

| Updated on: Jun 18, 2024 | 10:39 AM

ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगेसोयऱ्यांनादेखील ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला महिन्याभराचा वेळ दिला. आता ओबीसी आरक्षणाला धक्का नको यासाठी ओबीसी नेते देखील उपोषणासाठी मैदानात... बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं लिखित स्वरूपात द्या, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी असून त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यांना सरकारचं शिष्टमंडळ देखील भेटलं. पण त्यांनी पाणी घेण्यास नकार दिला तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय तर छगन भुजबळ यांनी आंदोलनासाठी मैदानात उतरणार असल्याचे म्हटले आहे. ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगेसोयऱ्यांनादेखील ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला महिन्याभराचा वेळ दिला. आता ओबीसी आरक्षणाला धक्का नको यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जालन्याच्या वडीगोद्री गावात उपोषणाला बसलेत त्यांची मागणी नेमकी काय आहे? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 18, 2024 10:39 AM