मराठ्यांच्या वादळाची नवी मुंबईमध्ये एन्ट्री, मनोज जरांगे पाटलांचा आज कुठं मुक्काम?
आज नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चा हा नवी मुंबईमध्ये प्रवेश करणार आहे. तर नवी मुंबईतील वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. तर लोणावळ्या मधून मुंबईच्या दिशेने निघालेला हा पायी मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठ्यांचा पायी मोर्चा अवघ्या काही तासात मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे. आज नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चा हा नवी मुंबईमध्ये प्रवेश करणार आहे. तर नवी मुंबईतील वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. तर लोणावळ्या मधून मुंबईच्या दिशेने निघालेला हा पायी मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकेल तर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मनोज जरांगे पाटलांचा तुफान मराठ्यांच्या गर्दीसह मुंबईत दाखल होणार आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा मुंबईकडे येण्याचा जो मार्ग होता तो पोलिसांकडून बदलण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठ्यांचा मोर्चा मुंबई-पुणे मार्गावरील जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मात्र मराठा आंदोलकांचा या जुन्या घाटातून असणाऱ्या मार्गाला विरोध करण्यात आलाय. दरम्यान, या पायी मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर सायन-पनवेल महामहार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आलीये.