लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा, थेट ओबीसी संघटना रस्त्यावर अन् केली जाळपोळ

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा, थेट ओबीसी संघटना रस्त्यावर अन् केली जाळपोळ

| Updated on: Jun 19, 2024 | 10:53 AM

ओबीसीचं गेल्या ६ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. तर काही ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. इतकंच नाहीतर जाळपोळही झाली आहे. जालन्यात ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात. हाकेंच्या उपोषणला पाठिंबा देण्यासाठी धुळे-जालना हायवेवर रस्तारोको करण्यात आलाय.

ओबीसीमधूनच मराठा आरक्षण घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं लिखित स्वरूपात द्या अशी मागणी ओबीसीचे लक्ष्मण हाके यांनी केली आहे. यासाठी ओबीसीचं गेल्या ६ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. तर काही ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. इतकंच नाहीतर जाळपोळही झाली आहे. जालन्यात ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात. हाकेंच्या उपोषणला पाठिंबा देण्यासाठी धुळे-जालना हायवेवर रस्तारोको करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ओबीसी कार्यकर्त्यांना हायवेवरच टायरची जाळपोळ करून थेट सरकारलाच इशारा दिला. ओबीसी आरक्षणाला धक्का नको यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जालन्याच्या वडीगोद्री गावात उपोषणाला बसलेत त्यांची मागणी नेमकी काय आहे? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 19, 2024 10:53 AM