सगेसोयरे, सरसकट मिळणार की नाही? आरक्षणावरुन पुन्हा भुजबळ अन् जरांगे आमने-सामने
सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी दाखल झाल्यानंतर छगन भुजबळ यांच्या अवाहनानंतर ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण थांबवलंय. यावेळी छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणास विरोध दर्शवला.
सरकारसोबत बैठक झाल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी आलं. छगन भुजबळ यांच्या अवाहनानंतर ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण थांबवलंय. यावेळी छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणास विरोध दर्शवला. तर जरांगे पाटलांनी १३ तारखेपर्यंत सगेसोयऱ्यांनुसार आरक्षण न मिळाल्यास मंडल आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली. दरम्यान, सरकारने ओबीसींच्या दोन मागण्या मान्य केल्यात. एक म्हणजे खोट्या कुणबी नोंदी देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार, दुसरी बाब म्हणेज सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर सर्वपक्षीय बैठकीत ठरवलं जाणार…आता सरकारने दिलेल्या आश्वासनावर ओबीसी नेत्यांचं समाधान झालंय. पण आता प्रश्न आहे की, मनोज जरांगे पाटील यांना सगेसोयऱ्यांवरून सरकारने दिलेल्या आश्वासनाचं काय होणार?