बेट्या तुझा टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार, जरांगे पाटलांचं भुजबळांना चॅलेंज
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांना डिवचल्याचे पाहायला मिळाले. तुझ्या अंगातलं रक्त जळलं म्हणून तू म्हातारा झाला. बेट्या तुझा टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार, असे वक्तव्य करत जरांगेंनी भुजबळांना चॅलेंजच दिलं आहे. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले ?
आता येवल्यावाल्याला सांगतो… भाऊ… छगन भाऊ.. तुझा असा इंगा जिरवतो. तू आमच्या आमच्यात काडी लावतो.. मी तुझ्या पुढचा आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांना डिवचल्याचे पाहायला मिळाले. तुझ्या अंगातलं रक्त जळलं म्हणून तू म्हातारा झाला. बेट्या तुझा टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार, असे वक्तव्य करत जरांगेंनी भुजबळांना चॅलेंजच दिलंय. पुढे जरांगे पाटील असेही म्हणाले, भांडणं लावतो ओबीस आणि मराठ्यात, गोर गरिब, धनगर बांधवात…तू कितीही डाव टाकले तरी मी ते यशस्वी होऊ देणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत छगन भुजबळांना फटकारलं. तू जितकं करणार तिवढे मराठे एक होतायंत. तुझा इतका फायदा होतोय मराठा समाजाला… तू काडी केली की मराठे बांबू घेऊन निघताय. पण तुला कसं कळत नाहीये, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Published on: Jun 25, 2024 05:17 PM
Latest Videos