एकदा आंदोलनाची तारीख ठरली की बस्स संपला विषय.., मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

एकदा आंदोलनाची तारीख ठरली की बस्स संपला विषय.., मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

| Updated on: Feb 21, 2024 | 2:03 PM

''सरकारने विशेष अधिवेशन घेतलं. पण त्यांचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही. तुम्ही निर्णय घेऊन मोठे होतात पण जनतेने नाही मानलं. तुम्ही सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही. जर ते केलं असतं तर तुमच्या अंगावरचा गुलाल १५ दिवस निघाला नसता. अजून एक दोन दिवस आहे तुमच्याकडे...पण....'

जालना, २१ फेब्रुवारी २०२४ : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्याची घोषणा केली. मात्र यावर मनोज जरांगे नाराज असून ते सरकारवरच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘सरकारने विशेष अधिवेशन घेतलं. पण त्यांचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही. तुम्ही निर्णय घेऊन मोठे होतात पण जनतेने नाही मानलं. तुम्ही सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही. जर ते केलं असतं तर तुमच्या अंगावरचा गुलाल १५ दिवस निघाला नसता. अजून एक दोन दिवस आहे तुमच्याकडे…पण एकदा का आंदोलनाची तारीख ठरली की बस्सस संपला विषय..’, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. पुढे ते असेही म्हणाले की, राजकारण डोळ्यासमोर ठेवून ही खेळी केली आहे. ते त्यांना लय गरजेचे आहेत. हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं असेल. शहाणे असतील तर त्यांनी कालच्या मॅटरवरून लक्षात घ्यावं. त्यांनी मनाने म्हणलं पाहिजे. लोकांचं विश्वास आहे. विश्वास घात होईल असं वागू नये, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Feb 21, 2024 02:03 PM