Maratha Reservation : २४ डिसेंबरपर्यंत सरकारला डिस्टर्ब करणार नाही, पण २४ नंतर जाहीरपणे सांगतो…
मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. यासंदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना वेळ वाढवून देण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम
छत्रपती संभाजीनगर, 19 डिसेंबर 2023 : सरकारने येत्या 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा आम्हाला पुढची दिशा ठरवावी लागेल. तसेच एकदा पुढची दिशा ठरवली तर मग आम्ही मागे हटणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. यासंदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना वेळ वाढवून देण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ते सरकारला वेळ वाढवून देण्यास तयार नाहीत. ’24 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या. विशेष अधिवेशन बोलवून तुम्ही आमची फसवणूक करु नका. नाहीतर आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावी लागले. ही दिशा एकदा ठरवली तर मी जाहीर सांगतो, मग आम्ही मागे सरकरणार नाहीत’, असेही ते म्हणाले.