….तर उभ्या जिंदगीत आला नसेल असा पश्चाताप सरकारला येणार, जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
'लेकरांच्या वेदना आणि त्रास होई नये, म्हणून समस्त मराठा संतप्त झाला आहे. हेच सरकारच्या लक्षात येत नाहीये. मराठा आरक्षणासाठी निघालेल्या या पायी यात्रेत लहान लेकरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत रात्रं-दिवस सगळेच सहभागी झाले आहे. याचा अर्थ सरकारच्या लक्षात यायला हवा'
अहमदनगर, २२ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांचा हा पायी मोर्चा अहमदनगरला भिंगार येथे पोहोचला आहे. मराठा आरक्षणासाठी मोठ्या ताकदेनं राज्यातील मराठा रस्त्यावर उतरला आहे. लेकरांच्या वेदना आणि त्रास होई नये, म्हणून समस्त मराठा संतप्त झाला आहे. हेच सरकारच्या लक्षात येत नाहीये. मराठा आरक्षणासाठी निघालेल्या या पायी यात्रेत लहान लेकरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत रात्रं-दिवस सगळेच सहभागी झाले आहे. याचा अर्थ सरकारच्या लक्षात यायला हवा. परंतु सरकारच्या हे लक्षात येत नाही. ही सत्तेची रग अंगात आहे. त्यामुळे आम्ही काहीही करू, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला फटकारलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, पूर्वीचा मराठा आता राहिला नाही. यावरून त्यांना कळायला हवं. ना पक्ष ना नेते या पलिकडे मराठा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो. या मोर्च्यातील एकातरी मुलाला त्रास द्यायचा प्रयत्न सरकारने केला तर….असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिलाय.