Manoj Jarange Patil यांचा राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे इशारा; ‘सरकारला आरक्षण द्यावंच लागेल’
VIDEO | बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे पहाटे सव्वा चार वाजता सभा झाल्याचे सांगत मराठे थांबत नाही आता, सरकारला आरक्षण द्यावंचं लागेल, असे म्हणज मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. तर सभेसाठी आलेल्या लोकांना गर्दी नाही तर ती वेदना असल्याचे जरांगे म्हणाले
बुलढाणा, १० ऑक्टोबर २०२३ | बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे पहाटे सव्वा चार वाजता सभा झाल्याचे सांगत मराठे थांबत नाही आता, सरकारला आरक्षण द्यावंचं लागेल, असे म्हणज मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. माझ्या सभेसाठी आलेल्या लोकांना गर्दी नाही म्हणता येणार ती आरक्षणाची वेदना आहे. मराठा समाजातील मुलांचं भविष्य आणि अस्तित्व दोन्हीही धोक्यात आले आहे. त्यामुळे घराघरातील मराठा हा रस्त्यावर उतरला आहे, त्यामुळे सरकारला आरक्षण द्यावच लागेल असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुनरूच्चार केलाय. २४ ऑक्टोबरपर्यंत सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कालावधी दिला आहे. सरकारला आरक्षण द्यावचं लागेल, यावेळेस सरकार मराठा समाजाचा अंत पाहणार नाही. मराठा समाजाचं हे पहिलं आणि शेवटचा आंदोलनाचा धडा असणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा थेट इशारा दिला आहे.