जरांगे पाटील यांचं माळी समाजाकडून कुठं झालं दणक्यात स्वागत? १०० JCB तून फुलांची उधळण, बघा Grand Welcome
मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात आपला तिसऱ्या टप्प्यातील दौरा सुरू. गेल्या ७५ वर्षांत मराठा समाजासाठी कुणी काय केलं हे मांडणार असल्याचं म्हणत त्यांच्या दौऱ्यावर दणक्यात सुरूवात झाली. १०० जेसीबीमधून फुलांची उधळण करत माळी समाजाकडून ग्रँड स्वागत करण्यात आलं.
मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ : कालपासूनच मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात आपला तिसऱ्या टप्प्यातील दौरा सुरू केलाय. यावेळी धाराशिवमधील वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं माळी समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आलं आहे. गेल्या ७५ वर्षांत मराठा समाजासाठी कुणी काय केलं हे मांडणार असल्याचं म्हणत त्यांच्या दौऱ्यावर दणक्यात सुरूवात झाली. १०० जेसीबीमधून फुलांची उधळण करत माळी समाजाकडून ग्रँड स्वागत करण्यात आलं. त्यामुळे गावा-गावात मराठा-ओबीसी एकजूट असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय. २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी डेडलाईन दिली. याआधी जरांगे पाटील यांनी हा महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. याला मराठ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. तर येत्या २४ नोव्हेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांची पूर्तता होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.