छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ टीकेवर जरांगे पाटलांच प्रत्युत्तर; म्हणाले, मी 100 टक्के चॅलेंज….
छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद झाली असता, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे . छगन भुजबळ म्हणाले, 3 कोटी मराठे मुंबईला येणार होते त्याचं काय झालं? भुजबळांच्या या टीकेवर मनोज जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर बघा एकेरी उल्लेख करत काय केला हल्लाबोल
मुंबई, 31 जानेवारी 2024 : छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद झाली असता, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे . छगन भुजबळ म्हणाले, 3 कोटी मराठे मुंबईला येणार होते त्याचं काय झालं? त्याचबरोबरं मागच्या दरवाजाने कुणबी दाखले प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत. या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, मंडळ आयोगाला चॅलेंज करायचं असेल तर बिंदास करावं, छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. जरांगे पाटील एकेरी उल्लेख करत म्हणाले, त्याला सांगितलं होतं. की तू पुलावर थांब 64 किलो मीटर लांब लाईन होती मराठ्यांची तू थांबला नाही पुलावर तर तुला कसं दिसेल मराठे किती होते . मी पुन्हा एकदा महाराष्ट्रामधील गावा खेड्यातल्या सामान्य ओबीसी बांधवाना सांगताो की त्याला आणखी समजवून सांगा मला चॅलेंज देतोय, मी चॅलेंज करायला जाईल आणि तो गोरगरिबांच वाटोळं करेल. याने जर पून्हा पुन्हा अश्या काड्या करायचा प्रयत्न केला. तर मंडळ कमिशन हा शिफारलेला नाही आहे, मी 100 टक्के चॅलेंज करेल मग त्यामुळे त्याला थांबायला सांगा नाहीतर मी चॅलेंज करणार आहे, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे